सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
तळावली-फोंडा येथील भिंगी फुडस्चे मालक सुदेश भिंगी यांची इन्स्टीटय़ुट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्ती नुकतीच करण्यात आली. तळावली येथील श्री महालक्ष्मी युवक संघाचेही ते अध्यक्ष आहेत. या निवडीबद्दल एका खास कार्यक्रमात मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले
संस्थेच्या कार्यात नवनियुक्त सदस्याचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा यावेळी श्री परब यांनी व्यक्त केली. सुदेश भिंगी यांनी या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्याच्यासमवेत संस्थेच माजी सदस्य सचिव गोरख मांद्रेकर व सदस्य अविनाश रामनाथकर उपस्थित होते.