नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भीमा कोरेगाव प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या कार्यकर्त्या आणि वकील सुधा भारद्वाज यांची तीन वर्षांनंतर गुरुवारी सुटका करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती यु. यु. लळित, न्यायमूर्ती एस. आर. भट आणि न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी यासंबंधीची सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने 1 डिसेंबर रोजी त्यांना डिफॉल्ट जामीन मंजूर केला होता. यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणेची याचिका फेटाळून लावली होती. सुधा भारद्वाज यांना 28 ऑगस्ट 2018 रोजी अन्य 16 जणांसह अटक करण्यात आली होती.