सांबरा : पंतबाळेकुंद्री येथील श्रीदत्त संस्थानचे मॅनेजिंग ट्रस्टी सुधीर सीताराम पंतबाळेकुंद्री (वय 76) यांचे बुधवार दि. 23 रोजी पहाटे 4.15 वाजता पुणे मुक्कामी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव पंत भक्तांच्या दर्शनासाठी सावित्रीबाई फुले महिला व बालविकास केंद्र, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल शेजारी, यमुनानगर निगडी पुणे येथे गुरुवारी सकाळी 11 ते 1 यावेळेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यविधी दुपारी 2 वाजता निगडी पुणे येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.