प्रतिनिधी /बेळगाव
ला?कडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्वांना अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती मदत करत आहेत. शहरात या परिस्थितीला अनेकजण आपला हातभार लावत आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील ट्रकचालकांना, आणि मालवाहतूकदारांना जेवणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे ही समस्या जाणून घेऊन संकेश्वर येथील सुन्नत जमात तंझीम कमिटीच्यावतीने ट्रकचालकांना जेवण देण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून रोज 700 ते 800 ट्रक चालकांना मालवाहतूकदारांना जेवण देण्यात येत आहे.
संकेश्वर येथील सुन्नत जमात तंझीम कमिटी ही बेळगाव अंजुमन ए-इस्लाम या संस्थेच्या नेतृत्वाखाली कार्य करते. संकेश्वरच्या आसपास असलेल्या सर्व गावांना मदत देण्याचे कार्य या संस्थेमार्फत केले जाते. गेल्या वर्षभरापासून ही संस्था कोरोनाग्रस्तांना आ?क्सिजन पुरविणे, मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे, गरजूंना धान्यरुपी मदत देणे यासह अनेक कार्ये करत आहे.
सदर संस्थेचे कार्य मन्सर मुल्ला, सोहेल हवालदार, मुन्ना सोलापुरे, मुबारक नालबंद, उस्मान सौदागर, फिरोज मालदार, अब्ब?सलमान संगोळी, अस्लम लंदूर हे पाहतात. तसेच बेळगाव अंजुमन ए इस्लाम या संस्थेचे राजू सेठ, समिउल्ला माडीवाले आणि अशपाक घोरी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभते.