बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमाराच्या (kannada superstar puneeth rajkumar) मृत्यूनंतर सध्या बेंगळूरमधील श्री जयादेवा इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-व्हॅस्क्युलर सायन्स अँड रिसर्च हॉस्पिटलमध्ये (Sri Jayadeva Institute of Cardiovascular Sciences and Research) अचानक रुग्णांची गर्दी वाढली आहे. यामध्ये ‘कार्डिओ-व्हॅस्क्युलर’ म्हणजे ह्दयाचे आरोग्य तपासण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हसन जिल्ह्यात राहणापरा नारायण (४६) आपल्या काकांसोबत येथे आला होता. त्याच्या छातीत दु:खत होते. ह्दयविकाराशी संबंधित हे दुखणे असल्याचा निष्कर्ष त्याने काढला. तसेच त्याने पुनीत राजकुमार सरांच्या मृत्यूनंतर मला कुठलाही धोका पत्करायचा नाहीय. त्यामुळे हसनवरून १८० किलोमीटरचा प्रवास करुन हॉस्पिटलं गाठलं” असं नारायणने सांगितले. पुनीत राजकुमार यांच्या मृत्यनंतर ह्दय तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या एकाएकी वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे.
पुनीतच्या मृत्यूनंतर तीन दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी आले. दिवसाला आम्ही सरासरी १ हजार रुग्णांवर उपचार करतो. पण सध्या दिवसाला १८०० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत, असे डॉ. सीएन मंजुनाथ यांनी सांगितले. ते श्री जयादेवा इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-व्हॅस्क्युलर सायन्स अँड रिसर्चचे संचालक आहेत. अचानक रुग्ण संख्या वाढल्यामुळे डॉक्टर, नर्से आणि सिस्टिमवरील ताण वाढला आहे.