चेन्नई
सुपरस्टार रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना रुटिन चेकअपसाठी रुग्णालयात नेले आहे, अशी माहिती समोर येत होती. पण त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे समोर आली आहे. रुग्णालयात दाखल होण्याच्या चार दिवस आधीच रजनीकांत यांना मानाच्या समजल्या जाणाऱया दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मेडिकल बुलेटिननुसार, रजनीकांत यांना चक्कर आल्याने त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. लवकरच ते रुग्णालयातून बाहेर पडणार आहेत.