क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित एस. पी. घाळी चषक सोळा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सुपर किंग्स संघाने एमसीसी संघाचा व ग्लॅडिएटर्स संघाने वॉरियर्स संघाचा 50 धावानी पराभव केला. मनिकांत बुकीटगार, गौरव काटे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर बुधवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सुपर किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 23 षटकात 3 बाद 192 धावा केल्या. त्यात मनिकांत बुकीटगारने 18 चौकारांसह 61 चेंडूत नाबाद 100 धावा करून शानदार शतक झळकाविले. शहाबाज जमखंडीने 6 चौकारासह 49, विराज हावेरीने 2 चौकारासह 22 धावा केल्या. एमसीसीसीतर्फे कृष्णा मेणसे, सोहन कल्लूर, मुव्हीज पठाण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल एमसीसीसी संघाचा डाव 19.1 षटकात 56 धावांत आटोपला. गणेश वाय.ने 4 चौकारासह सर्वाधिक 20, सोहन कल्लूरने 2 चौकारासह 11 धावा केल्या. सुपर एमसीसीसीतर्फे वैभव करिशण्णावरने 14 धावात 3, मनिकांत शिवानंद व आदित्य दंगणावर यांनी प्रत्येकी 7 धावात 2 गडी बाद केले तर विकास पाटीलने 10 धावात 2 तर शुभा मुंगुरवाडीने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात ग्लॅडिएटर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 23 षटकात 7 बाद 134 धावा केल्या. गौरव काटने 2 चौकारासह 31, काविष मुकनावरने 2 चौकारासह 28, अनमोल पागदने 20, उबेदुल्लाने 19 धावा केल्या. वॉरियर्सतर्फे अभिषेक निकमने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना वॉरियर्सचा डाव 20 षटकात 84 धावात आटोपला. उत्कर्ष शिंदेने 2 चौकारासह 21, साईराज साळुंखेने 23, साहिल सुर्यवंशीने 18 धावा केल्या. ग्लॅडिएटर्सतर्फे गौरव काटेने 6 धावात 4, ओवेज नबुवालेने 6 धावात 3 तर उबेदुल्लाने 19 धावात 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे प्रमोद पवार, शहजाद, अनिल गवी यांच्या हस्ते सामनावीर गौरव काटे व इम्पॅक्ट खेळाडू उबेदुल्ला तर दुसऱया सामन्यात सामनावीर मनिकांत व इम्पॅक्ट खेळाडू वैभव के. यांना प्रमुख पाहुणे चंदन कुंदरनाड, विकास देसाई व मोहम्मद ताहीर सराफ यांच्या हस्ते चषक देवून गौरविण्यात आले.