ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यातील द्राक्ष बागायतदार तसंच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी आता सुपर मार्केट तसंच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. एकीकडे राज्य सरकार निर्णयाचं समर्थन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
दरम्यान, शरद पवारांना प्रसारमाध्यमांनी वाइन विक्रीचा निर्णय आणि विरोधासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणालेत की, “वाइन तसंच इतर मद्यांमधील फरक समजून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केला तरी माझा विरोध असण्याचं कारण नाही”.