ऑनलाइन टीम / अरुणाचल प्रदेश :
जागतिक स्पर्धेत सहा वेळा गोल्ड मेडल मिळवणारी भारताची सुपर मॉम, महिला बॉक्सर मेरी कोमही आता कोरोना लढ्यात उतरली आहे. मेरी कोम ने आपला एक महिन्याचा पगार सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत माहिती देताना मेरी कोम म्हणाली की, मी माझा एक महिन्याचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये देणार आहे. तसेच माझ्या पगाराव्यतिरिक्त माझ्या खासदार निधीतून एक कोटींचा निधी मदतकार्यासाठी देणार आहे.
दरम्यान, याआधी गोल्डन गर्ल हिमा दास हीने ही आपला एक महिन्याचा पगार आसाम सरकारला दिला आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनीही आज पंतप्रधान सहाय्यता निधीत हातभार लावला आहे.