जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंह यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘अटॅक’चा टीजर सादर करण्यात आला आहे. जॉनने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवर 1 मिनिट 23 सेकंदांचा हा टीजर प्रदर्शित केला आहे. टीजर पाहून हा एक जबरदस्त ऍक्शन आणि देशभक्तीचा संदेश देणारा चित्रपट असल्याचे जाणवते.
टीजरच्या प्रारंभी जॉन आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या व्यक्तिरेखांना एका स्फोटानंतर अश्रू ढाळताना दर्शविण्यात आले. त्यानंतर जॉन अब्राहम एक ‘सुपर सोल्जर’ (जवळपास रोबोकॉप टाइप)मध्ये रुपांतरित होताना दिसून येतो. चित्रपटात संसदेवरील दहशतवादी हल्ला आणि आण्विक हल्लाही दर्शविण्यात येणार असल्याचे टीजर पाहून वाटते. या चित्रपटात जॉन अब्राहमची व्यक्तिरेखाच भाव खाऊन जाणार असल्याचे टीजरमधून निदर्शनास येते. चित्रपटात बहुधा जॅकलीन आणि रकुल यांच्या व्यक्तिरेखांना फारसा वावा नसावा. लक्ष्यराज आनंद यांच्या दिग्दर्शनात निर्माण हा चित्रपट 28 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.