नवी दिल्ली
2021 हे वर्ष आयपीओंचे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यावर्षी एकापाठोपाठ आयपीओ सादर करण्यात आले आहेत. या अनुषंगाने येत्या 16 डिसेंबरला सुप्रिया लाइफसायन्स यांचा आयपीओ खुला होणार आहे. या आयपीओचे मूल्य कंपनीने 265 ते 274 रुपये प्रति समभाग इतके ठेवले असून या आयपीओच्या माध्यमातून 700 कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत. 16 डिसेंबरला खुला होणारा आयपीओ 20 डिसेंबरला बंद होणार आहे.