ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. ते नेहमी सोशल नेटवर्किंगवर काहींना काही पोस्ट करत असतात. त्यांच्या पोस्टची नेहमी चर्चा होत असते. त्यांच्या याच वेगळेपणामुळे ते नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असतात. या शिवाय थरुर हे आणखीन एका गोष्टींसाठी चर्चेत असतात ते त्यांच्या महिला सहकाऱ्यांमुळे. सध्या थरुर यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळेही (Supriya Sule) दिसत आहेत. हा व्हिडीओ अनेक मजेशीर कॅप्शनसहीत व्हायरल झाल्यानंतर थरुर यांनी नेमकं काय घडलं होतं याबद्दल खुलासा केलाय.
सोशलमीडियावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या संसदेती गप्पांचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावेळी लोकसभेत नियम 193 अंतर्गत युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा सुरू होती. त्यावेळे नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला (farooq abdullah) हे सभागृत बोलत होते. त्यांच्या मागील बाकावर बसलेल्या सुप्रिया सुळे आणि थरूर हे कुठल्यातरी विषयावर बोलत होते. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर नेटकरी आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
परंतू सोशल मीडियावर तो व्हिडीओ ट्रोल करणाऱ्यांना शशी थरूर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हटले की, ‘जे लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संभाषणाला ट्रोल करीत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, की त्या मला धोरणांसंदर्भातील प्रश्न विचारत होत्या, कारण बोलण्यासाठीचा पुढचा क्रमांक त्यांचाच होता. फारुख साहेबांना त्रास होऊ नये म्हणून त्या (सुप्रिया) हळू आवाजात बोलत होत्या. मी त्यांचे (सुप्रिया) बोलणे ऐकण्यासाठी खाली वाकलो होतो’.
यासोबत थरूर म्हटले की, अमर प्रेम चित्रपटातील गाण्याचा उल्लेख करीत ट्विट केले की, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना. ‘