ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी मंगळवारी कोर्टात यासंदर्भात माहिती दिली. सरन्यायाधीश एस. एस. बोबडे यांनीसुद्धा उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक निर्देश दिले आहेत.
दरम्यान, न्यायालयाच्या कोर्ट नंबर दोनमध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना सुनावणी करताना मास्क घातलेले पाहायला मिळाले.
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या कक्षेत वकिलांना संबंधित बैठकीची माहिती दिली आहे. बैठकीत सरन्यायाधीशांनी न्यायालयातील कर्मचारी आणि वकिलांना एच1एन1च्या लसीकरणाची सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं सांगितलं आहे.