ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुबोध भावे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे.तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, अशी विनंती देखील केली आहे.
यापूर्वी अभिनेत्री दिपाली सय्यद हीने देखील कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच तिने तिच्या सोबत असलेल्या इतरांनाही कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन केले. त्यानंतर दिपालीने कोरोना टेस्ट केली असता तिचा रीपोर्ट निगेटिव्ह आला आहे.