वृत्तसंस्था\ प्राग्वे
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील प्राग्वे चॅलेंजर पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागलने उपउपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. त्याचा प्रतिस्पर्धी ब्रिटनचा क्लार्क जखमी झाल्याने त्याने हा सामना अर्धवट सोडला.
एटीपीच्या क्रमवारीत 127 व्या स्थानावर असलेल्या नागलने दुसऱया फेरीतील सामन्यात क्लार्कवर 6-3, 5-7, 4-1 अशी आघाडी मिळविली असताना क्लार्कने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. 22 वर्षीय नागलला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. नागलचा पुढील फेरीतील सामना झेकच्या लिहेकी बरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारताचे डी. शरण आणि श्रीराम बालाजी दुहेरीत खेळणार आहेत.