प्रतिनिधी / बेळगाव
सुरक्षितता आणि खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठेतील सर्व व्यापाऱयांनी यापुढे आपल्या दुकानात किंवा आस्थापनांमध्ये सुरक्षा उपकरणे बसविण्याची नोटीस पोलिसांनी दिली आहे. कर्नाटक नागरी सुरक्षा कायदा 2017 अंतर्गत यापुढे व्यापाऱयांना ही उपकरणे बसविणे बंधनकारक असणार आहे.
या कायद्याच्या अनुषंगाने व्यापाऱयांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे आवश्यक आहे. शिवाय तो 24 तास कार्यरत असणे बंधनकारक आहे. सलग 30 दिवस या कॅमेऱयातील छायाचित्रे संग्रहीत होतील. यावर भर दिला पाहिजे. दुकानाचे स्वरुप लक्षात घेऊन सुरक्षा रक्षकाची नियुक्तीही करावी आणि त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असेही नोटिसीद्वारे कळविण्यात आले आहे.
दुकाने किंवा आस्थापनांना भेट देणाऱया नागरिकांची आणि वाहनांची तपासणी करण्यासाठी आवश्यक उपकरणे असावीत. आगीपासून बचाव करण्यासाठी अग्निशमक उपकरणे बसवावीत, सीसीटीव्ही कॅमेरा कोठे आहे ती जागा आणि आपत्कालीनप्रसंगी बाहेर पडण्याची जागा याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. तीन महिन्यांमध्ये ही सर्व सुरक्षा यंत्रणा दुकानदारांनी व व्यापाऱयांनी अंमलात आणावी. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.