लंडन / वृत्तसंस्था
जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून भारतातील मुंबई आणि दिल्ली या शहरांनी ‘टॉप फिफ्टी’मध्ये स्थान पटकावले आहे. या यादीत डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनने सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून स्थान पटकावले आहे. आतापर्यंत आघाडीवर असलेल्या टोकियो आणि ओसाका या शहरांना मागे टाकत कोपेनहेगन शहराने हा मान मिळवला आहे. यावषी दुसऱया क्रमांकावर कॅनडामधील टोरंटो आणि तिसऱया क्रमांकावर सिंगापूरचा समावेश करण्यात आला आहे. यादीमध्ये मुंबई 48 व्या आणि दिल्ली 50 व्या स्थानी आहे. गेल्या वषी दिल्लीला 52 वा आणि मुंबईला 45 वा क्रमांक देण्यात आला होता. 2017 आणि 2019 या वर्षामध्ये आघाडीचा क्रमांक मिळवलेल्या टोकियोला यावेळी पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने याबाबत सर्व्हे केल्यानंतर सुरक्षित शहरांसंबंधीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. या युनिटने जगातील सर्वात सुरक्षित 60 शहरांची नावे जाहीर केली आहेत. सुरक्षाविषयक एकूण 76 मापदंड लक्षात घेऊन या शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. डिजिटल सुरक्षा, आरोग्यविषयक सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा अशा विविध निकषांचा त्यात समावेश आहे. तसेच इंटरनेटची उपलब्धता आणि पर्यावरण आदी निकषही समाविष्ट आहेत.