ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गुजरातच्या सुरतमधील दोन विद्यार्थिनींनी मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा लघुग्रह शोधला आहे. ‘HLV2514’ असे या नव्या लघुग्रहाला नावदेण्यात आले आहे. अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नेई-मेलद्वारे या वृत्ताला दुजोरा देत विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.
राधिका लखानी आणि वैदेही वेकारिया अशी नवा लगुग्रह शोधलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोघीही पीपी सावनी चैतन्य विद्या संकुलात शिकतात. त्यांनी SPACE संस्थेत खगोलीय अभ्यासाचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच नासाशी संबंधित अखिल भारतीय लघुग्रह शोध मोहिमेशी (AIASC) त्या संबंधित आहेत. राधिका ही अमरेली तर वैदेही भावनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
HLV2514 हा लघुग्रह मंगळ ग्रहाच्या जवळ आहे. तो काही दिवसांनी पृथ्वीलाही क्रॉस करू शकतो, असे ऑल इंडिया ॲस्टरॉईड सर्च कॅम्पेनचे संचालक डॉ. पॅट्रीत मिलर यांनी म्हटले आहे.