आमदार महादेवप्पा यादवाड यांची माहिती
वार्ताहर/ रामदुर्ग
तालुक्मयामध्ये सुरळीत वीजपुरवठय़ासाठी एकूण 140 कोटी रुपये खर्चातून 110/11 केव्ही वीज वितरण केंद्राचे विस्तारीकरण करण्यात येत असल्याचे आमदार महादेवप्पा यादवाड यांनी सांगितले. येथील विद्युत प्रसारण केंद्राच्या आवारात 43 लाख रुपये अनुदानातून कामाचे भूमिपूजन करून ते बोलत होते.
आमदार पुढे म्हणाले, तालुक्मयातील बन्नूर येथे नूतन 220 केव्ही विद्युत पुरवठा केंद्र स्थापण करण्यास 40 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच याची निविदा मागविण्यात येणार आहे. तालुक्मयातील उदपुडी येथे नूतन 110 केव्ही विद्युत पुरवठा केंद्र स्थापण्यासाठी 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच तालुक्मयातील बटकुर्की, हुलकुंद, सुरेबान व मागनूर केंद्राच्या विस्तारासाठी प्रत्येकी 20 कोटी रुपयांचा प्रस्तावही शासनदरबारी सादर करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
शहरातील विद्युत पुरवठा केंद्राचा विस्तार करण्यासाठी जागेची कमतरता आहे. यासाठी हलगत्तीनजीक दहा एकर जागा मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार यादवाड यांनी दिली. हेस्कॉम उपविभागाचे कार्यनिर्वाहक अभियंता रामकृष्णा गुणगा यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी साहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंता ए. आर. कराडे, साहाय्यक अभियंता रुपा हालप्पन्नवर, नरसिंह मानशेट्टी, सोहेल नदाफ, प्रभावती गंधद, हणमंत रोट्टी आदी उपस्थित होते.