वार्ताहर/ किणये
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे बेळगाव जिल्हय़ातील राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे पक्षातील कार्यकर्ते व समर्थक यांच्यातून हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.
पश्चिम भागातील कार्यकर्त्यांच्यावतीने खासदार सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राकसकोप येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरेश अंगडी यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या विकासकार्याचा आढावा घेणारी तसेच राजकीय प्रवासाबद्दलची मनोगते अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी राकसकोप पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
संतिबस्तवाड येथील ग्रामदेवता सोसायटीतर्फे सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दीपा मुत्तेनट्टी व चेअरमन राजकुमार बाळेकुंद्री यांच्या हस्ते अंगडी यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. जयश्री माळी, नागेंद्र सिद्दण्णावर, पिराजी मेलगे, कल्लाप्पा देसूरकर, शुभम लोहार, सातेरी माळी, बाळाराम पाटील, बाळू मछेंदर, अश्विनी बेळगावकर, दीपा तुर्कगोळ, परशराम पोटे, सातेरी बडसकर, विश्वनाथ हलगेकर, अशोक तुर्कगोळ, भरमा गुडूमकेरी आदी उपस्थित होते.