प्रतिनिधी / सावंतवाडी:
कांबळेवीर – मांजरेकरवाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त कुडाळ तालुका मास्तर कै सुरेश लक्षमण मांजरेकर (76) यांचे शनिवारी निधन झाले. पच्छात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी जि प बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ सहाय्यक आनंद मांजरेकर व सातार्डा येथील डॉक्टर स्मिता राऊळ यांचे ते वडील होत. तसेच श्री रवळनाथ मेडिकल स्टोअर्सचे मालक तथा भाजपाचे बांदा मंडळ उपाध्यक्ष ज्ञानदीप राऊळ यांचे ते सासरे होत.