ऑनलाईन टीम / पठाणकोट :
दरोडेखोरांच्या हल्ल्यात क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. पंजाबच्या पठाणकोटमधील थारियाल गावात 20 ऑगस्ट दरम्यान घडली.
अशोक कुमार (वय 58) असे मृत्यू झालेल्या रैनाच्या काकांचे नाव आहे. तर कुमार यांची आई सत्या देवी, पत्नी आशा देवी, मुले अपिन आणि कुशल हे चौघे या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
अशोक कुमार यांचे ज्येष्ठ बंधू श्याम लाल यांनी ते रैनाचे काका असल्याची पुष्टी केली आहे. पठाणकोटच्या माधोपूरजवळील थारियाल गावात दरोडेखोरांनी अशोक कुमार यांच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी कुमार यांच्या घरातील सर्वजण घराच्या गच्चीवर झोपले होते. ऐवज हाती न आल्याने त्यांनी अशोक कुमार यांच्यासह घरातील चार जणांवर दरोडेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात अशोक कुमार यांचा मृत्यू झाला. पठाणकोटचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक गुलनीतसिंग खुराणा यांनी यासंदर्भात माहिती दिली.