नवी दिल्ली
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना वडील त्रिलोकचंद रैना यांचे रविवारी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. भारतीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सुरेश रैना यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
35 वर्षीय सुरेश रैनाने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 18 कसोटी, 226 वनडे आणि 78 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने सुरेश रैनाच्या वडिलांना आदरांजली वाहिली आहे.