वर्षापूर्वी उभारलेला मोबाईल टॉवर ठरला शोभेची वास्तू, डोंगरमाथ्यावर जावे लागते रेंचसाठी, रानटी जनवारांची भीती, सरकार लक्ष देईल काय ?
उदय सावंत/सुरला सत्तरी.
एका बाजूने रानटी जनावरांची भीती तर दुसऱया बाजूने काळोखाचे साम्राज्य, हल्लीच्या काळात पावसाचे वाढते प्रमाण अशा भयानक अवस्थेत सत्तरी तालुक्मयातील सुरला गावातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. सुर्ला गावाच्या डोंगराच्या माथ्यावर अगदी धोकादायक अवस्थेत बसून विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण घेताना दिसत आहेत. कारण गावात नेटवर्क नाही. एकाच ठिकाणी नेटवर्क मिळते. त्यामुळे सदर ठिकाणी ऑनलाईन हजेरी लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सध्या शिक्षण खात्याने पुन्हा एकदा ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून सुरलातील विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अशा भयानक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नेटवर्क अभावी गावातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागणाऱया त्रासाची प्रत्यक्ष भेटून आढावा घेण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सत्तरी तालुक्मयातील ठाणे पंचायत क्षेत्रात येत असलेल्या सुरला गावात नेटवर्क सुविधा उपलब्ध झालेली नाही. एक वर्षापूर्वी जिओ कंपनीचा टॉवर उभारण्यात आलेला आहे मात्र अद्याप कार्यान्वित झालेला नाही. यामुळे ऑनलाइन शिकवणीला प्रारंभ झाल्यानंतर या भागातील विद्यार्थी नेटवर्कच्या शोधात घनदाट जंगलामध्ये पोचले व ज्याठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे. गेल्या एक वर्षापासून घनदाट जंगलामध्ये बसून विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
भयानक परिस्थितीचा सामना कसा करावा : कुणाल गावकर
सदर ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्षपणे पाहणी केली असता ज्याठिकाणी विद्यार्थी अभ्यासासाठी बसत आहेत सदर जागा अत्यंत धोकादायक आहे. खोल दरी व डोंगराच्या एकदम टोकाला एका कठडय़ावर बसून हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कुणाल गावकर या विद्यार्थ्याने सांगितले की, सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू केल्यापासून आम्हाला या ठिकाणी येऊन अभ्यास करावा लागत आहे. आम्हाला डोंगर माथ्यावर जंगलात नेटवर्क उपलब्ध आहे. तेथे साप येण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे पावसाळी मोसमात किचडांचा (कान्टा) त्रास असून दुसऱया रानटी जनावरांची भीती असते. याठिकाणी वीज पुरवठय़ाचे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोबाईल डिस्चार्ज झाला की घरी जाऊन पुन्हा चार्ज करून या ठिकाणी येऊन बसावे लागते, अशी माहिती त्यांनी दिली.
सदर ठिकाण तरुणीसाठी धोकादायक. निशा गावकर
पर्ये सत्तरी येथील भूमिका हायरसेंकडरीत शिक्षण घेणारी निशा गावकर हिने सांगितले की, घनदाट जंगलात ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी मुलींना अक्षरशः धोका पत्करावा लागत आहे. आपण एकमेव मुलगी याठिकाणी घनदाट जंगलामध्ये बसून ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सरकारने सुरला गावांमध्ये ताबडतोब नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
गेल्या वषीपासून सदर ठिकाण बनले परीक्षा हॉल : पुनाजी गावकर
11 वीत शिक्षण घेणाऱया पुनाजी गावकर याने सांगितले की, गेल्या एक वर्षापासून आम्हाला शाळेचा हॉल नाही तर ज्याठिकाणी नेटवर्क उपलब्ध होते ते ठिकाण परीक्षेचा हॉल समजावा लागत आहे. मात्र घनदाट जंगलातील रानटी जनावरांची भीती तर दुसऱया बाजूने विषारी सापांचा सामना करावा लागत असल्याचे त्याने सांगितले.
एक वर्षापूर्वी टॉवर उभारला मात्र कनेक्शन नाही–सुर्यकांत गावकर. यागावांमध्ये नेटकर्व उपलब्ध व्हावे यासाठी जिओ कंपनीने टॉवर उभारलेला आहे मात्र अजून पर्यंत सदर टॉवरला विजेचे कनेक्शन उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे सदर टॉवर कार्यान्वित होऊ शकलेला नाही. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कदाचित या गावांमध्ये नेटवर्कची सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिक गोव्याच्या बदलत्या घडामोडीची सलग्नीत होणार असल्याची प्रतिक्रिया भागाचे पंचायत सभासद तथा ठाणे पंचायतीचे उपसरपंच सूर्यकांत गावकर यांनी व्यक्त केली. याठिकाणी विजेचे कनेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. याबाबत लवकरच गावातील ग्रामस्थांना चांगली बातमी मिळेल व त्यानंतर लगेचच टॉवर कार्यान्वति होणार अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे.