सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघाति सुर्ला गावात गेल्या दोनशे वर्षांची परंपरा जपणारा शिगमो रोमटामेळ आजही हिंदू -मुसलमान धार्मिक एकतेचे प्रतीक पाहायला मिळत आहे आज गुरुवारी संध्याकाळी सुर्ला देऊलवाडा येथील रोमटामळे पिर साहेब दर्गा च्या परिसरात घुमचे कटर घुम च्या तालावर लोकगीते सादर केली मुस्लिम बांधवानी ही हिंदु चे शानदार स्वागत केले पिर साहेब कडे धार्मिक एकता कायम राहणे सर्वांचे भले कर अशी मागणी केली, अशी माहिती येथील स्थानिक धर्म गुरूने दिली तसेच येथील धार्मिक कार्यक्रमला हिंदूंनीसहभागी व्हायला हवे असे सांगितले यंदा प्रथमच मर्यादित स्वरूपात हा कार्यक्रम पार पडला या वेळी मुस्लिम धर्म गुरू, बांधव, स्थानिक नागरिक तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य गोपाळ सुर्लकर,पंच सुभाष फोडेकर, महेंद्र शिरोडकर, पत्रकार सुरेश बायेकर,भानुदास सोननाईक,सत्या सतोडकर, इत्यादी ची खास उपस्थित ती होती
दर्गा परिसरात सुशोभीकरण व्हायला हवे : गोपाळ सुर्लकर
सांखळी मतदारसंघातिल परी साहेब दर्गा आहे याला दोनशे वर्षेच इतिहास असल्याचे स्थनिक मुस्लिम समाज सांगत आहे हा परिसर पुरातन वस्तू म्हणून सरकार पाहत असले तरी परिसरात शक्मय असल्यास हा परिसर सुशोभीकरण करून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सुर्लकर यांनी या विषयी बोलताना सांगितले तसेच गावातील देवस्थान, पंचायत समितीचे सहकार्य ही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले महेंद्र शिरोडकर, सुभाष फोनडेकर यांनी या विषयी माहिती दिली