वार्ताहर / औंध
समाजाप्रति असलेली आपली बांधिलकी जपण्याचे नवनाथ पाटील युवा प्रतिष्ठानने हाती घेतलेले लोककल्याणकारी काम कौतुकास्पद आहे. गावच्या विकासासाठी अशीच ऐक्याची एकजूट दाखवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुर्लीला निधी उपलब्ध करून देण्यात हात आखडता घेणार नाही. अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी दिली.
सुर्ली ता. कराड येथील नवनाथ पाटील युवा प्रतिष्ठानच्यावतीने दिवाळी पाडव्यानिमित्त जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, कोविड योध्दे, कला, क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला यावेळी जगदाळे बोलत होते.
यावेळी कराड उत्तर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रशांत यादव, हिंदकेसरी संतोष वेताळ, नवनाथ पाटील, डी.ए.पाटील, माजी सरपंच जयसिंग पाटील, अमित फुके, क्रुष्णत मदने, अश्विनीताई वेताळ, पोलीस पाटील पद्मिनी माने, ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला वेताळ, उद्धव पाटील, विश्वास तुपे, सागर फुके, सोमनाथ मदने, सचिन माने, अमोल भोगे, भीमराव माने, शेखर माने,उत्तम वेताळ, संतोष माने, शंकर वेताळ (नाना),मंगेश वेताळ, राहुल वेताळ,संभाजी माने, किशोर सकपाळ, सचिन वेताळ, आदेश फुके,शरद मोरे, वैभव कळंबे,राजेंद्र कळंबे,गणेश वेताळ उपस्थित होती.
जगदाळे म्हणाले कोरोनाच्या संकटात प्रत्यक्ष मैदानात काम करणारे कोविड योध्दे असतील तसेच जीव हातात घेऊन सीमेवर देशाचे संरक्षण करणारे आजी माजी सैनिक, आणि गावाला दिशा देणारे जेष्ठ नागरिक यांचा केलेला सन्मान त्यांना उर्जा देईल. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही राष्ट्रवादी काँगेस पक्षाची विचारधारा आहे.
नेमक्या याच मार्गाने नवनाथ पाटील युवा प्रतिष्ठानची वाटचाल सुरू आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीची पाठराखण करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रशांत यादव, हिंदकेसरी संतोषआबा वेताळ, यांनी मनोगत व्यक्त केले.