वांते सत्तरी येथील समई नृत्य सादर
सांखळी/प्रतिनिधी
सांखळी सुर्ल येथील श्री सिदेश्वर नवदुर्गा देवस्थानचा वार्षिक कालोउत्सव मोठय़ा उत्साहात शुक्रवारी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमा निशी साजरा करण्यात आला या निमित्त वांते सत्तरी येथील दुर्गा महिला मंडळ तर्फे पालखीचे स्वागत म्हणून समई नृत्य सादर करण्यात आले होते
या निमित्त सकाळ पासून मंदिरात धार्मिक विधी, अभिषेक, देवीची ओटी भरणे, नवस फेडणे, इत्यादी कार्यक्रम झाले वांते सत्तरी येथील दुर्गा महिला मंडळ तर्फे पालखीच्या स्वागतार्ह त समईनृत्य सादर करण्यात आले, यात नेहा नाईक, संजना मळेकर,रोशनी मळे कर, अनामिका गावडे, प्रियंका सावर्डे कर, निकिता नार्वेकर, प्रविणा पीळ येकर, रंजीता पीळयेकर,मैथिली पीळ येकर, उर्वशी सावर्डेकर, आरती साटकळकर, स्वप्नील नार्वेकर, आदित्य नार्वेकर यांचा सहभाग होता ,
श्रीची पालखीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येईल, या वेळी देवस्थान अध्यक्ष रामा गावकर, देवस्थान पदाधिकारी ,गावकर मंडळी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती, तदनंतर संखासुरवध नाटय कालो उत्सव सादरीकरण झाले आणि दशावतारी नाटय़ प्रयोग सादर करण्यात आला, पारंपरिक गवळण केल्याने उत्सवाची सांगता झाली .
खेळ, खेळणी, खाजे आणि फुलं विपेत्यांचीं विविध दुकाने
कोरोना महामारी नंतर प्रथमच गोव्यातील जत्रेत, आणि कालोउत्सव अलोट गर्दी पाहायला मिळत आहे, शुक्रवारी सुर्ल कालोउत्सव निमित्त मंदिर परिसरात विविध खेळ, खेळणी, खाजे, भाजे, फुले इत्यादि सामानाची दुकाने थाटण्यात आलीं होती त्यास चांगला प्रतिसाद लाभला कोरोना महामारी अजूनही असर असल्याने सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर भाविकांची केला, या वेळी गावातील बाराही वाडय़ावरीलभक्त व गोव्यातील अनेक ठिकाणहुन भक्त येऊन देवाचे दर्शन घेतले
नवसाला पावणारी सुर्लची नवदुर्गा
सांखळी सुर्ल देऊळवाडा येथील सिद्धेश्वर नवदुर्गा देवस्थान च्या नवदुर्गा मंदीरात ही आज मोठी गर्दी पाहायला मिळाली नवसाला पावणारी देवी म्हणून असंख्य भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात व नवस बोलतात ओटी भरून देवीचा आशीर्वाद घेतात आज पासून या परिसरात कालो उत्स वाला खरी सुरवात होते
प्रतिशोध” दशावतारी नाटय़ प्रयोग रंगला
सांखळी सुर्ल कालो उत्स वात यंदा श्री अष्ठ विनायक पारंपरिक दशावतार नाटय़ मंडळ निरवडे सावंतवाडी यांचा महान पुराणिक नाटय “प्रयोग प्रतिशोध” चा नाटय़ प्रयोग सादर केला यात संतोष रेडकर,अर्जुन रेडकर,विनायक कोनकर,प्रथमेश परब, संतोष गावडे, प्रथमेश मळगावकर, मधुकर भोई,महादेव गोवेकर, मोहन हारमलकर,तन्मय नाईक,
संगीत साथ : शैलेंश गावडे, राजेश मेस्त्री, संदीप दळवी, गोटय़ा मेस्त्री, दयानंद राऊळ, पांडुरंग माठकर,यांचा सहभाग होता