मिनी मॅरेथॉन, रांगोळी, धावणे आदी स्पर्धांना सुरुवात
वार्ताहर /हिंडलगा
सुळगा येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाने गेली 15 वर्षे भागातील युवक-युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवषी दीपावलीला मोठय़ा प्रमाणात क्रीडा महोत्सव भरवून या भागामध्ये वेगळा आदर्श घालून दिलेला आहे. फक्त सोसायटीपुरता मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे तालुक्मयामधील अनेक युवकांना व युवतींना प्रोत्साहन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे, असे उद्गार युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी काढले.
बेळगाव तालुका संघातर्फे आयोजित विविध स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील होते. प्रारंभी शिवप्रतिमेचे पूजन शिवाजी अतिवाडकर यांच्या हस्ते झाले. लक्ष्मी प्रतिमेचे पूजन सुळगा ग्रामपंचायत अध्यक्षा निर्मला कलखांबकर यांनी केले. दीपप्रज्वलन गव्ह. कॉन्ट्रक्टर शिवाजी अतिवाडकर, किरण धमाले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्यावतीने बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा प्रेमा हिरोजी, सदस्य कल्लाप्पा देसूरकर, जोतिबा देसूरकर, भरमा कोलकार, महेश कांबळे, गणेश सुतार, उचगाव ग्रा. पं. सदस्य बळवंतराव पावशे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनीही गेल्या पंधरा वर्षांतील संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, मिनी मॅरेथॉन, रांगोळी स्पर्धा यांचे उद्घाटन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला गणेश दूध संकलन केंद्राचे प्रमुख प्रवीण देसाई, माजी एपीएमसी सदस्य बाळू देसूरकर, रोहित पेट्रोल पंपाचे मालक रोहित पाटील, वैजू पाटील, यल्लाप्पा पाटील, महेश पाटील, आनंदा चौगुले, युवराज देसूरकर, लक्ष्मण पाटील, मारुती देसूरकर, इराप्पा पाटील, उचगाव ग्रा. पं. सदस्य एल. डी. चौगुले, सुळगा ग्रा. पं. सदस्य महादेव कंग्राळकर, शटुप्पा पाटील, सागर पाटील, भागाण्णा नरोटी, मारुती पाटील, किरण पाटील यांच्यासह सर्व शाखांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सल्लागार व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.