उद्योग खात्री योजनेंतर्गत रस्ता-कालव्याच्या कामांना गती
प्रतिनिधी / बेळगाव
सुळगा (ये.) ग्राम पंचायतीच्या माध्यमातून उद्योग खात्री योजनेंतर्गत येणाऱया कामांना आता सुरुवात करण्यात आली आहे. गावातील शिवारातील रस्ता तसेच 3 फूट खोलीच्या कालव्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली
आहे.
ग्राम पंचायत अध्यक्षा गंगव्वा नाईक, माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य अरविंद पाटील यांच्या पुढाकारातून या कामांना गती देण्यात आली.
यावेळी या कामासाठी 110 महिला कामगारांना काम देण्यात आले. यावेळी यमुना पाटील, पीडीओ दुर्गाप्पा ताशिलदार, क्लार्क अमित कुकडोळकर, शोभा नंद्याळकर, सचिन पाटील, जोतिबा बोंगाळे, अक्षय पाटील, नागराज नावगेकर, सिद्धाप्पा नाईक, विष्णू लोहार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित
होते.