ग्रामीण आमदार चषक 2022
वार्ताहर /सुळगे येळ्ळूर
सुळगे (येळ्ळूर) येथील एपी युवा मंच आयोजित क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद शिवशक्ती बी संघाने मिळविले. भव्य आकर्षक ट्रॉफी व 61000 रूपये रोख देऊन त्यांना गौरविण्यात आले. सलग बारा दिवस चाललेल्या या स्पर्धेत बेळगाव, खानापूर, नंदगडसह कोल्हापूर परिसरातील अव्वल संघांनी भाग घेतला होता.
ग्रामीण आमदार जषक 2022 या स्पर्धेच्या अंतिम सामन्याअगोदर शौर्या स्पोर्टस् कपिलेश्वर विरूद्ध गणेश ज्वेलर्स लायन्स पिरनवाडी आणि शिवशक्ती बी विरूद्ध गणेश स्पोर्ट्स जुने बेळगाव यांच्यात उपांत्य सामने घेण्यात आले. जिंकलेल्या शिवशक्ती बी आणि शौर्या स्पोर्टस् कपिलेश्वर यांच्यात अंतिम सामना खेळविण्यात आला. नाणेफेक युवा नेते मृणाल हेबाळकर यांच्या हस्ते करण्यात आली. शिवशक्ती बी संघाने बाजी मारत अजिंक्यपद मिळविले तर शौर्या स्पोर्टस् यांना दुसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. यू टय़ुब चॅनेलवर सामने दाखविण्यात आले.
बक्षीस वितरणावेळी प्रास्ताविक बी.बी. पाटील यांनी केले. अंतिम फेरीतील विजेत्या शिवशक्ती बी संघाला कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद पाटील, प्रभाकर नावगेकर, रवि हाजगोळकर व अक्षय पाटील यांच्या हस्ते साडेचार फूट उंचीचा आकर्षक चषक व 61,000 रुपये रोख रूपये देण्यात आले. संघमालक डॉ. संतोष पाटील व संघनायक कैफ यांनी गौरव पुरस्कार स्वीकारला तर दुसऱया क्रमांकाला ट्रॉफी व 21000 रूपये प्रभाकर नावगेकर, सोमनाथ टक्केकर, जोतिबा दोडमनी व पंडित आणि पाटील यांनी संघ मालक शशी राजपूत व कर्णधार रोहन घुमटेकडे सुपूर्द करण्यात आले.
उत्कृष्ट संघ म्हणून श्री गणेश स्पोर्ट्स जुने बेळगाव यांना नागेंद्र कुंडेकर, नागराज नावगेकर, भूषण पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट यष्टीरक्षक दस्तगीर गणेश ज्वेलर्स, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अवधूत मांगले (शिवशक्ती बी) यांना चांदीचे ब्रासलेट देण्यात आले. शौर्या स्पोर्टस्च्या अझर अश्रफिनला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. त्याला रेफ्रीजरेटर देण्यात आला. अंतिम सामन्यासाठी अनंत माळवी व सागर कोलेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी पाटील यांनी केले. आभार के.एन.पाटील यांनी मानले. युवराज जाधव यांनी सामन्यांचे समालोचन केले. यल्लाप्पा कणबरकर, सागर पाटील, नागेंद्र कुंडेकर, नागराज नावगेकर, भूषण पाटील, सुशांत नावगेकर, प्रशांत भाऊ पाटील, बाबू कंग्राळकर, मनोहर कंग्राळकर, युवराज पाटील, मनोहर कंग्राळकर, धामणेकर, अनिकेत येळूरकर यांनी परिश्रम घेतले.