प्रतिनिधी / बेळगाव
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील सुळेभावीमधील जामिया मशीद यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रम सुळेभावी मुस्लीम स्मशानभूमी आणि ईदगाह मैदानावर पार पडला. यावेळी दोन्ही ठिकाणी वन विभागाच्या सहकार्याने 200 रोपे लावण्यात आली. यावेळी वृक्षारोपणासाठी 200 रोपटय़ांचा पुरवठा केल्याबद्दल वन विभागाचे आभार मानण्यात आले. यावेळी सुन्नी जमात कमिटीचे अध्यक्ष रझाक कोन्नुर, सेपेटरी अमीरसाब नदाफ, सदस्य शफी जमादार, जंगु अत्तार, खादीरसाब जमादार, अझिज हुदली, इमामहुसेन हुदली, मलिक बागेवाडी, जमाल कडबी आदी उपस्थित होते.