येळ्ळूर चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये झाली बैठक
प्रतिनिधी / येळ्ळूर
श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ व श्री चांगळेश्वरी हायस्कूलचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली आहे. गुरूवारी हायस्कूलच्या सभागृहात बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर होते.
प्रारंभी संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर, मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, प्रायमरी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. राऊत यांनी मार्गदर्शन केले. याचबरोबर रामदास धुळजी, चेतन हुंदरे, विनोद लोहार, शुभम नांदवडेकर, किरण टक्केकर यांनी आपले विचार मांडले. माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी रामदास धुळजी, कार्याध्यक्षपदी चेतन हुंदरे, उपाध्यक्षपदी विनोद लोहार, सतीश धामणेकर, शुभम नांदिवडेकर, सेपेटरी हरिष पाटील, उपकार्याध्यक्ष किरण टक्केकर, उपसेपेटरी नितेश मजुकर, सिध्दार्थ पाटील यांची निवड करण्यात आली.
जनसंपर्कपदी अनंत पाटील, किरण लोहार, आकाश हुंदरे, अजय पाटील, विठ्ठल पाटील, तानाजी सुळेभावी, मनोज बाचोळकर, सोमनाथ मुचंडी, आनंद कुंडेकर, सोशल मीडीयासाठी आनंद शिन्नोळकर, आशिष पाटील, मयुर शहापूरकर, क्रीडा प्रमुख म्हणून रवीराज टक्केकर, गणेश कुगजी तर सल्लागार यांचीही निवड करण्यात आली आहे. मार्गदर्शक म्हणून निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील, आर. बी. राऊत हे राहणार आहेत. या बैठकीला मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.