बेळगाव : सुवर्णविधानसौधमध्ये सोमवारपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे कोरोना आणि ओमिक्रॉनने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने विधानसौध परिसरात सोमवारी ट्रक्टरद्वारे सॅनिटायझर केले. विधानसौध परिसरात आंदोलनकर्ते मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱयातून नागरिक येत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून मनपाने ट्रक्टरद्वारे सॅनिटायझर केले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने आणि हिवाळी अधिवेशनासाठी सुवर्णसौध परिसरात गर्दी वाढत असल्याने सॅनिटायझर फवारणीची मोहीम तीव्र केली आहे. सोमवारी सकाळी सुवर्णसौध परिसरात उभारलेल्या भव्य मंडपात सॅनिटायझर करण्यात आले.
Previous Articleशिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याबाबत खडाजंगी
Next Article प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था दूर करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.