प्रतिनिधी/ बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून व संस्थापक संभाजी भिडे गुरुजींच्या प्रेरणेतून स्वराज्याची राजधानी असणाऱया रायगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘32 मण सुवर्णसिंहासन’ उभारले जाणार आहे. या सुवर्ण सिंहासनाच्या निर्मितीसाठी कर्तव्य निधीचा ओघ सुरू झाला आहे. शुक्रवारी भिडे गुरुजी बेळगावमध्ये आले असता त्यांच्याकडे कर्तव्यनिधीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
अलतगे गावच्या शिवभक्तांनी 50 हजार 151 रुपये, वल्लभ व स्वरा प्रदीप किल्लेकर यांनी 10 हजार 111 रु., शिवपारायण धारकऱयांनी 11 हजार 905 रु., नागेंद्र शंकरराव कुंडेकर यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ 10 हजार 111 रु., मल्लेश बडमंजी 10 हजार रु., भवानीनगर, शिवाजी चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 10 हजार रु., मुकेश कामटे यांनी 5 हजार रुपयांचा धनादेश भिडे गुरुजी व शिवप्रति÷ानच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द केला.