वार्ताहर / सांबरा
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिंदोळी व शिंदोळी ग्रामस्थ यांच्यावतीने रायगडावर निर्माण होणाऱया 32 मन सुवर्ण सिंहासन निर्माणासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिंदोळी व शिंदोळी ग्रामस्थ यांच्यावतीने 1,01,101 रु. चा निधी शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शिवप्रतिष्ठान शिंदोळी यांच्यावतीने नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार व निधी समर्पणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघटनेच्यावतीने नूतन ग्रा. पं. सदस्य बाबूगौडा पाटील, पिराजी अनिगोळकर, सतीश शहापूरकर, मल्लप्पा तिप्पनगोळ, सागर मुचंडी, मोनेश मातारी, यल्लाप्पा शहापूरकर, वीरभद्रय्या पुजारी, बसवराज तळवार, गंगव्वा पुजारी, सविता मुचंडी, नागेंद्र कुरबर, नंदिनी कुरबर यांचा सत्कार करण्यात आला. शिवप्रतिमेचे पूजन जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी केले. यावेळी सुवर्ण सिंहासन निर्माणाबाबत कणबर्गी विभागप्रमुख हिरामणी मुचंडीकर यांनी तर गडकोट मोहिमेसंदर्भात बाळेकुंद्री विभागप्रमुख प्रवीण मुरारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सांबरा विभागप्रमुख भुजंग धर्मोजी, निलजी विभागप्रमुख पिराजी मोदगेकर, कपिल पाटील, वडगाव विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते व शिंदोळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी जोगाणी यांनी केले. मोहन मातारी यांनी आभार मानले.