कैरो / वृत्तसंस्था
भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा सुवेझ कालवा वाहतुकीसाठी पूर्णतः मोकळा करण्यासाठी अद्याप काही कालावधी लागणार असला तरी त्या अडकलेले जहाज बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यामुळे आता हा कालवा वाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणात खुला झाला आहे, असे या कालव्याच्या व्यवस्थापनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. एक मोठे मालवाहू जहाज या कालव्यात अडकलेले गेला आठवडाभर अडकलेले होते. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. विशेषतः तेलाची वाहतूक बऱयाच प्रमाणात प्रभावित झाली होती. त्यामुळे जगात चिंतेचे वातावरण होते.
अडकलेले जहाज बाहेर काढण्यासाठी बरीच खटपट करावी लागली. या जहाजाला कालव्याच्या समांतर स्थितीत आणून एका बाजूला नेण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचा पुढचा प्रवास सुरू होईपर्यंत कालवा खुला होण्याची शक्यता नव्हती. जहाज पुढे जाण्यास प्रारंभ झाल्यानंतर कालवा वाहतुकीसाठी पूर्ण मोकळा करण्यास साडेतीन ते चार दिवस लागतील, असे सांगण्यात आले होते. तथापि अपेक्षेपेक्षा अधिक लवकर हे काम पूर्ण झाले, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
वाहतूक पुन्हा सुरू
आडवे जहाज पुन्हा सरळ करून त्याला कालव्यातून बाहेर काढण्यात यश आल्याने इतर जहाजांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे युरोप ते दक्षिण आशिया असा मालवाहू जहाजांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वाहतूक पूर्वपदावर येईल, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. सुवेझ कालवा हा जगातील सर्वाधिक वाहतूक होणार कालवा असल्याचे सांगण्यात येते.