ऑनलाईन टीम / पूर्णिया :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला 24 तास पूर्ण होण्या पूर्वीच सुशांत सिंह राजपूतच्या परिवारावर दुसरा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बिहारमधील त्याच्या चुलत भावाच्या पत्नीचे निधन झाले आहे. सुशांतच्या मृत्यूचा मानसिक धक्का सहन न झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या चुलत भावाची पत्नी सुधा देवी या सुशांतच्या मूळ गावी पूर्णियाच्या मलडीहा येथे राहत होत्या. सुधा देवी या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. सुशांतच्या मृत्यूची बातमी समजल्यावर त्यांची तब्येत अधिक खालावली. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. त्याच्यावर गोळ्यांचा परिणाम होईनासा झाला. त्या सारख्या बेशुद्ध पडत होत्या. पण मध्ये मध्ये शुद्धीत आल्यावर सुशांत कसा आहे? एवढंच विचारत होत्या. दरम्यान, सोमवारी जेव्हा सुशांत वर अंत्य संस्कार करण्यात आले त्याच वेळी सुधा यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुधा देवी यांच्या पतीने आधी भाऊ गेला, आता पत्नी देखील गेली, आता मी कोणासाठी जिवंत राहू असे दुःख व्यक्त केले आहे.