कंगना रनौत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मनोज वाजपेयी, धनुष यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण विभागातर्फे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी 67 व्या राष्ट्रीय चित्रपटांच्या पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत ‘छिछोरे’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर मनोज वाजपेयी आणि धनुष यांना ‘भोसले’ आणि ‘असुरन’मधील भूमिकेसाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘स्पेशल मेन्शन पुरस्कारां’मध्ये चार चित्रपटांची निवड झाली असून ‘बि?र्याणी’ (मल्याळम), ‘जोनाकी पोरबा’ (आसमि?या), ‘लता भगवान करे’ (मराठी), ‘पि?कासो’ (मराठी) यांनी बाजी मारली आहे.
चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला ‘छिछोरे’ हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा चित्रपट प्रेक्षकांनाही प्रचंड आवडला. तर नॉन फिचर चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हिंदी चित्रपट ‘ऍन इंजिनियर्ड ड्रीम’ला मिळाला. याचे दिग्दर्शन हेमंत गावा यांनी केले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटस्नेही राज्य म्हणून सिक्कीमची निवड जाहीर करण्यात आली आहे. सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपटासाठी ‘होली राईट्स’ (हिंदी), ‘लाडली’ (हिंदी) यांचा गौरव होणार असून सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट म्हणून ‘द स्टॉर्क सेवियर्स’ला बहुमान मिळाला आहे. बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी) हे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ठरले असून सावनी रविंद्र (रान पेटलं) यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा सन्मान प्राप्त झाला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स) ची निवड झाली आहे.
2019 या वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांना या पुरस्कार सोहळय़ात विविध प्रवर्गांमध्ये गौरवान्वित करण्यात येणार आहे. मागील वषी मे महिन्यामध्येच हा पुरस्कार सोहळा पार पडणे अपेक्षित होते. पण, कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्मयामुळे हा सोहळा लांबणीवर पडला होता. 2020 हे संपूर्ण वर्ष कोरोनाशी लढण्यात गेल्याने मागच्यावषी पुरस्कारांची घोषणा होऊ शकली नाही. त्यामुळे सोमवारी 2019 मध्ये निर्मिलेल्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदा राष्ट्रीय पुरस्काराचा मान कोणत्या चित्रपटाला मिळणार याचीच उत्सुकता कलाकार मंडळींना लागून राहिली होती. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण, 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ात विजेत्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रपतींकडून विजेत्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कन्नडमधील दोन चित्रपटांची पुरस्कारावर मोहोर
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर कन्नड भाषेतील दोन चित्रपटांनी मोहोर उमटविली आहे. अभिनेता रक्षित शेट्टी याचा अभिनय असलेल्या ‘अवने श्रीमन्नारायण’ (तोच श्रीमन्नारायण) या चित्रपटाला साहसदृष्ये दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विक्रम मोर यांनी साहसी दृष्यांचे दिग्दर्शन केले होते. तर कन्नडमधील ‘अक्षी’ या चित्रपटाला कन्नडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
67व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावे
ऑडियोग्राफी – राधा
ऑन लोकेशन साऊंड रेकॉर्डीस्ट – रहस
सर्वोत्कृष्ट छायांकन – सविसा सिंह (सोनसी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – नॉक नॉक नॉक
सर्वोत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट – ओरु पाथिरा
सर्वोत्कृष्ट लघु काल्पनिकपट – कस्टडी
सर्वोत्कृष्ट ज्युरी पुरस्कार – स्मॉल स्केल व्हॅल्यू
बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह – जक्कल
सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट – होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट – द स्टॉर्क सेवियर्स
सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट – कस्तुरी