ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी सकाळी छापा टाकला. रियासह सॅम्युयल मिरांडाच्या घरी देखील एनसीबीची दुसरी टीम पोहोचली असून झडती सुरू आहे. ह्या टीम सकाळी साडेसहा वाजताच रीयाच्या घरी दाखल झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रियाच्या मुंबईतील घरी एनसीबीसह मुंबई पोलीस, CBI ची ची टीम पोहोचली असून मागील दोन तासांपासून झडती सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा एक नियमित तपासाचाच एक भाग असून आम्ही त्यानुसारच रिया आणि सॅम्युयलच्या घराची झडती घेत आहोत.
रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे ड्रग्ज तस्करांशी असलेले संबंध उघड झाले असून रीया आणि शौविकचे ड्रग्ज प्रकरणा संबंधित व्हॉट्सॲप चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत झैद, बासित, अब्बास आणि करण अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे.