ऑनलाईन टीम / पाटणा :
रिया चक्रवर्ती ही बऱ्याच काळापासून माझ्या मुलाला विष पाजत आहे, असा आरोप सुशांतसिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
यावेळी के.के. सिंह यांनी म्हटले की, रियाने सुशांतचा खून केला आहे. त्यामुळे तपासयंत्रणांनी रिया व तिच्या साथीदारांना पकडून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, सध्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून मुंबईत सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. गेल्या काही दिवसांत रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी यांच्यासह अनेकांची चौकशी करण्यात आली आहे.