गेल्या अनेक दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रबर्ती या दोघांच्या नात्याची बरीच चर्चा आहे. अनेक ठिकाणी हे दोघे एकत्र दिसले आहेत. पण या दोघांनी अद्याप आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. लवकरच हे दोघे मोठय़ा पडद्यावरही एकत्र दिसणार आहेत. वाशु भगनानी यांच्या आगामी चित्रपटात सुशांत सिंग राजपूत प्रमुख भूमिकेत असून यामध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून रिया चक्रबर्तीची वर्णी लागली आहे. एम. एस. धोनी, केदारनाथ, काय पो चे या चित्रपटातून सुशांतने आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे. तर छिछोरे या चित्रपटामुळे तो पुन्हा प्रकाशझोतात आला. पण छिछोरेनंतर त्याने एकाही चित्रपटाला होकार दिला नव्हता. एका मुलाखतीत त्याने म्हटले होते की, मला अभिनेता म्हणून विविध पैलू शिकायचे आहेत. वाशु भगनानी यांच्या चित्रपटाची क्रिप्ट आवडल्याने त्याने यासाठी होकार दिला आहे. पुढील महिन्यापासून या चित्रपटाची तयारी तो सुरू करणार आहे. रुमी जाफरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. एप्रिल महिन्यापासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे.
Previous Articleआटपाट नगरची सफर
Next Article ज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातही नाही.