नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
अंमलीपदार्थविरोधी पथकाने एनसीबीने (NCB) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला Siddharth अटक केली. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी सिद्धार्थला हैदराबाद इथून अटक केली. लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती समोर आली आहे.
१४ जून २०२० रोजी मुंबईतल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला. या प्रकरणात अंमली पदार्थांचे कनेक्शन समोर येताच एनसीबीनेही तपासाला सुरूवात केली. अंमली पदार्थाप्रकरणी एनसीबीने शुक्रवारी सिद्धार्थ पिठानी याला अटक केली. याआधीही एनसीबीने तपासासाठी सिद्धार्थ पिठानी, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, स्टाफ दिपेश सावंतसहीत काही लोकांना अटक केली होती. चौकशीदरम्यान सिद्धार्थने काही धक्कादायक खुलासे केले होते.