पटना / वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच बिहारमधील भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना पुढील काही दिवस जाहीर प्रचारापासून लांब रहावे लागणार आहे. ते सध्या पाटण्यातील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुशीलकुमार मोदी यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यानंतर अलगीकरण किंवा कोरोना चाचणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.