वृत्तसंस्था/ कोलंबो
भारताचा मध्यफळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव मंगळवारी कोलंबोतून ब्रिटनला रवाना झाला. इंग्लंड दौऱयावर गेलेल्या भारतीय संघातील शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, अवेश खान यांना दुखापती झाल्याने हे खेळाडू मायदेशी परतले आहेत. जखमी खेळाडूंच्या जागी आता सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांची निवड करण्यात आली होती. बुधवारपासून सुरू होणाऱया पहिल्या कसोटीत मयांक अगरवाल उपलब्ध राहू शकणार नाही.
धवनच्या नेतृत्वाखाली भारताचा दुसऱया संघाने लंकेचा दौरा केला. या दौऱयात भारताने वनडे मालिका जिंकली तर टी-20 मालिका गमाविली. या मालिकांसाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांचा समावेश होता. आता सूर्यकुमार यादव कोलंबोतून थेट लंडनला रवाना झाला आहे.