लंडनमधील सोहळय़ात पुरस्कार प्रदान
लंडन / वृत्तसंस्था
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना लंडनच्या संसद भवन येथील मानाचा ‘एशियन युके एक्सलन्स अवॉर्ड 2022’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. लंडनचे खासदार वीरेंद्र शर्मा, नवेंडू मिश्रा व राडांक इंटरनॅशनल मिडिएटर एक्स्पर्ट या संस्थेच्या संस्थापक डॉ. रेणू राज यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. जगभरातून निमंत्रित करण्यात आलेल्या मोजक्मया व्यक्तींमध्ये प्रा. डॉ. चोरडिया यांचा समावेश होता.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटने समग्र व शाश्वत विकासाच्या क्षेत्रात युवकांना उत्तम शिक्षण जागतिक बाजारात योगदान देऊ शकतील अशी युवापिढी घडविण्याचे काम केले आहे. याच भरीव कामगिरीबद्दल डॉ. चोरडिया यांना नुकत्याच झालेल्या ‘एशियन युके बिझनेस समिट 2022’मध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतासह लंडन, जपान, आयर्लंड, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया यांच्यास अन्य देशांचे मान्यवर उपस्थित होते. सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱया मान्यवरांना या सन्मानाने गौरविण्यात आले.
या उत्तम कामगिरीबद्दल सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटच्या संपूर्ण टीमचे आयोजक व मान्यवरांनी अभिनंदन केले. डॉ. चोरडिया यांच्या दूरदृष्टी, समर्पण, अथक प्रयत्नांमुळेच ‘सूर्यदत्त’ची वाढ झाली आहे. नाविन्यपूर्ण शिक्षणातील जागतिक दर्जाचे केंद्र बनले आहे. पाश्चिमात्य बाह्यदर्शनासह जागतिक दर्जाचे ज्ञानकेंद्र, नाविन्यपूर्ण, मूल्याधारित शिक्षण याची सांगड घातली गेली आहे. ‘सीएसआर’मधील त्यांचे योगदान व दर्जेदार शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सहयोग कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार वीरेंद्र शर्मा यांनी काढले.