दिग्दर्शक रोहित शेट्टीचा चित्रपट ‘सूर्यवंशी’चे गाणे ‘आईला रे आईला’चा टीजर प्रदर्शित झाला आहे. गाण्यात सिंघम (अजय देवगण), सिंबा (रणवीर सिंह) आणि सूर्यवंशी (अक्षय कुमार)ची ग्रँड एंट्री दिसून येते. हे गाणे 21 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज चाहत्यांसाठी प्रदर्शित होणार आहे.
सूर्यवंशी चित्रपटाला कुठल्याही कटशिवाय यु/ए प्रमाणपत्र मिळाले आहे. हा चित्रपट 145 मिनिटांचा आहे. 21 ऑक्टोबर रोजी चित्रपटाच्या गाण्याच्या प्रदर्शनासोबत याचे प्रमोशनल कॅम्पेन सुरू होणार आहे. सूर्यवंशीचे दुसरे गाणे 24 ऑक्टोबर रोजी सादर केले जाऊ शकते. या गाण्यात अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ दिसून येणार आहे.
हा चित्रपट दिवाळीवेळी 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. अक्षय कुमार चित्रपटात डीसीपी वीर सूर्यवंशी तर कॅटरिना ही अदिति सूर्यवंशीची व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे. वीर हा मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाचा प्रमुख आहे. मुंबईतील दहशतवादी गटाचे हल्ले रोखताना अक्षय कुमार दिसून येणार आहे.