प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण करण्यासाठी अनेक ठिकाणी टनेल किंवा डोम उभारले जात आहेत. त्यामधून जाणाऱया व्यक्तींवर रसायनाची फवारणी केली जाते. परंतु, या निर्जंतुकीकरणाला कोणताही शास्त्राrय आधार नाही. रसायने व्यक्तींना अपायकायक ठरू शकतात. त्यामुळे अशाप्रकारे कोरोनापासून बचाव करण्यासाठी डोम किंवा टनेल याचा वापर करू नये, असे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालकांनी काढले असून डोम किंवा टनेल वापरास बंदी घालण्यात आली आहे. अनेकदा ही रसायने व्यक्तीला अपायकारक देखील ठरु शकतात. त्यामुळे व्यक्ती किंवा समूहावर डिसइन्फेक्टंट रसायनाची फवारणी करणारी सॅनिटेशन डोम किंवा टनेल त्यासारख्या यंत्रणांचा वापर करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिक डॉ. अर्चना पाटील यांनी काढले आहेत. त्यामुळे आता जिल्हय़ात ठिकठिकाणी उभारण्यात येणारे डोम किंवा टनेल काढावे लागणार आहेत.