वृत्तसंस्था / गॉडेलेजेरा (मेक्सिको)
2021 डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या बेडोसाने सिडेड खेळाडू सॅबेलिनेकाचा पराभव केला. तसेच दुसऱया एका सामन्यात ग्रीसच्या सॅकेरिने पोलंडच्या स्वायटेकवर विजय मिळविला. या हंगामातील ही शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.
या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या स्पेनच्या 23 वर्षीय बेडोसाने गुरुवारी रात्री खेळविण्यात आलेल्या सामन्यात द्वितीय मानांकित आर्यांना सॅबेलिनेकाचा 6-4, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. दुसऱया एका सामन्यात ग्रीसच्या सॅकेरिने पोलंडच्या स्वायटेकवर 6-2, 6-4 अशी मात केली. आता चिनचेन इझा गटात सॅकेरी आणि बेडोसा आघाडीवर आहेत. स्वायटेकचा पुढील सामना सॅबेलिनेकाशी तर बेडोसाचा सामना सॅकेरीशी होणार आहे.