मुंबई
256 जीबीचा गॅलक्सी एस 20 एफसी हा दमदार स्मार्टफोन नुकताच सॅमसंगने दिमाखान लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 53 हजार 999 रुपये इतकी आहे. क्लाऊड नेव्ही रंगाच्या या स्मार्टफोनचे बुकिंग सॅमसंग डॉट कॉम खेरीज इतर प्रमुख ऑफलाइन आणि ऑनलाईन रिटेल स्टोअरवर 17 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. या फोनची डिलिव्हरी 28 ऑक्टोबरपर्यंत केली जाणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. 8 जीबी-128 जीबी स्टोरेजचा हा फोन वॉटर आणि डस्ट रेझिस्टंट असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 4500 एमएएच इतक्या दमदार बॅटरीचा हा फोन असणार आहे.