स्मार्टफोन 5-जी स्वरुपात : भारतीय बाजारात दाखल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सॅमसंगने भारतीय बाजारामध्ये ‘गॅलेक्सी ए22’ हे मॉडेल 5-जी स्वरुपात सादर केले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि वॉटरड्रॉप स्टाईल डिस्प्ले मिळणार आहे. यासोबतच 8 जीबी रॅमसह डॉल्बी ऑडिओही राहणार आहे. यामध्ये 11 5-जी बँडला सपोर्ट करणारी सुविधा आहे.
नवीन ए22 ची किमत
यातील 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मॉडेल स्मार्टफोनची किमत 19,999 रुपये आणि 8 जीबीसह 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किमत ही 21, 999 रुपये राहणार आहे. फोन ग्रे, मिंट आणि वायोलेट रंगामध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.